मराठीत आणखीन एक नावीन्यपूर्ण प्रयोग
कायम नवनवीन प्रयोग करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे पुन्हा एकदा काहीतरी नवीन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. विषयाचं गांभीर्य ओळखून कवडे यांनी ‘एडल्ट्स ओन्ली’ हा सिनेमा ‘आयफोन६’ वर चित्रीत करण्याची योजना आखली आहे.
सेव्हन हॉर्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते अमित धुपे ‘एडल्ट्स ओन्ली’ या चित्रपटाची निर्मिती करीत असून, राज यादव या कंपनीचे सीईओ आहेत. ‘तानी’,‘ फुंतरू’ या मराठी चित्रपटांची निर्मिती करणारे अजय ठाकूर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.
काहीतरी नवीन करायचं यासाठी ‘एडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपट आयफोनवर चित्रीत करण्यात येणार नसून, विषय आणि कथानकाची गरज असल्याने हा विचार पुढे आल्याचं मत अजय ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. काही तरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मतनिर्माते अमित धुपे यांनी व्यक्त केलं.
‘येड्यांची जत्रा’, ‘फोर इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ तसेच प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘१२३४’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे यांचा ‘एडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपटही त्यातील वेगळेपणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, नेहमीच काहीतरी नवीन देण्यासाठी मी प्रयत्नशील असतो. ‘एडल्ट्स ओन्ली’ या चित्रपटाचा विषय आजवर कधीही मराठी चित्रपटात आलेला नाही. अशा प्रकारचं कथानक सादर करण्यासाठी महागडा केमेरा वापरण्याची गरज नाही. चित्रपटाच्या शीर्षकावरून या विषयाचा अंदाज येतो. त्यानुसार अशा प्रकारची कथा चित्रीत करण्यासाठी ‘आयफोन६’चा वापर करायचं ठरवलं आहे. यासाठी आम्ही जवळजवळ सहा महिने रिसर्च केला आहे. मराठीत यापूर्वी कधीच असा प्रयोग करण्यात आलेला नाही. कॅमेरामन आणि इतर तंत्रज्ञांची निवड झाली असून, लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सु/वात करण्यात येणार आहे.