बालपणातल्या आठवणींची शिदोरी
मराठी चित्रपटात सध्या नवनवे प्रयोग होऊ लागले असून पठडीबाहेरच्या आशयपूर्ण विषयांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. अशाच चाकोरीबाहेरचा ‘किल्ला’ सिनेमा प्रेक्षकांना रविवार १० जुलै दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ७.०० वा. झी टॅाकीजवर पहाता येणार आहे.
प्रत्येकाच्या आयुष्याचा सुंदर काळ म्हणजे बालपण. बालपणातल्या अनेक आठवणी उराशी बाळगून प्रत्येकजण मोठा होतो. अशाच आठवणींची शिदोरी बरोबरीने घेत एका लहानग्याचा प्रवास ‘किल्ला’ चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटात आई मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
सततच्या बदलीचे शाळकरी मुलांवर होणारे परिणाम राहत्या घरापासून शाळेतल्या मित्रांपर्यंत सगळं नवं असलेल्या या परिस्थितीशी जुळवून घेताना बालमनाची घालमेल, त्याच्या मानसिक हिंदोळ्याचा वेध सुरेखरित्या घेणारा किल्ला प्रेक्षकांसाठी आशयपूर्ण मेजवानीच असणार आहे.
किल्ला’ या चित्रपटात अमृता सुभाष, अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी हे बालकलाकार आहेत. चांगल्या आशयाबरोबरच कोकणातील निसर्गसौदर्याचा आस्वाद देणाऱ्या ‘किल्ला’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार १० जुलै दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ७.०० वा. झी टॅाकीजवर अवश्य पहा.