सिल्क फॅब १५ जुलैपासून; १५० संस्थांचा सहभाग
राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळातर्फे आयोजित ‘सिल्क फॅब’ हे प्रदर्शन आणि विक्री १५ जुलैपासून सुरू होत असून, ते २८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत मुंबईकरांना हे प्रदर्शन एक्स्पो सेंटर, जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे बघता येईल आणि मनपसंद खरेदीही करता येईल.

अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून हातमाग संस्था केवळ त्यांचे उत्पादन परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करुन देत नाहीये तर रंग, रचना आणि विणकामाविषयी ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याचा फायदा भविष्यात त्यांच्या उत्पादनात सुधारणा करण्यात होईल.
‘सिल्क फॅब’या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्वांना त्यांच्या उत्पादनावर ‘हँडलूम मार्क’ दिसेल अशा पध्दतीने लावण्यास सांगितले असून ज्यामुळे हातमाग कामगारांच्या कमाईत वाढ होईल. भारत सरकारने ‘हँडलूम मार्क’पध्दती आणली असून ज्या माध्यमातून उत्पादनाची ओळख करुन देण्याबरोबरच त्याचे वेगळेपण अधोरेखित करण्यात मदत होते. ग्राहकांनाही असे उत्पादन विकत घेताना ते खरोखरीच हातानेच विणले गेले आहे याची हमीही मिळवून देते.
‘सिल्क फॅब’ हा हातमाग विकास आयुक्त, वस्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांचा राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाच्या (एनएचडीसी) माध्यमातून सुरु केलेला उपक्रम असून, त्यामागे भारतातील विविध शहरात हातमाग विणकऱ्यांना त्यांची उत्पादने बाजारपेठेत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळवून देण्याचा हेतू आहे.