कमावला एनआयएफएफचा बहुमान

मोहर हा सिनेमा जानेवारी २०१६ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सयाजी शिंदे, आदिती सारंगधर आणि प्रसाद ओक हे मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाच लेखन रेखा जगताप यांनी केल आहे.
मोहरला एनआयएफएफचे सर्वोत्तम दिग्दर्शन, लेखन आणि सामाजिक संदेश असे एकूण तीन पुरस्कार मिळाले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोहरचे निर्माते अनुसया इंटरप्राईजेसचे संगीता गौतम सातदिवे आणि राहुल सातदिवे हे उपस्थित होते. अनुसया इंटरप्राईजेसचा नुकताच ‘यारो कि यारी’ हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.