एनआयएफएफचा संगीत गौरव

या अल्बममध्ये अभिनेता विनय देशमुख प्रियकराच्या भूमिकेत आहे. चंद्रहास रहाटेंची संकल्पना आणि लेखणीतून ‘समबडी कुणीतरी प्रेम करावं’ हे गीत साकारले. इमॅन्यूएल बर्लिन या ताज्या दमाच्या संगीतकाराने हे गीत संगीतबद्ध केले असून मिलिंद शिगवण या तरुण गायकाने हे गीत गायले आहे. हा अल्बम दर्शना दीपक धनावडे आणि अनिकेत कदम या तरुणांनी दिग्दर्शित केला असून विनय देशमुख, गरिष्मा वाढिया, शिवकांत लखनपाल यांच्यावर हे गाणे चित्रित झालेले आहे.
राकेश राऊत यांचं छायाचित्रण तर योगिता पाटीलने नृत्यदिग्दर्शन केलेलं आहे. व्यवसायाने आर्थिक सल्लागार असलेले चंद्रहास रहाटे हे कवीदेखील आहेत. रहाटेंची रचना असलेल्या ‘समबडी कुणीतरी प्रेम करावं’ या गाण्यातून प्रेम नाकारलेल्या प्रेमवीराच्या विरहाची व्यथा व्यक्त झालेली आहे.