मुंबई येथील चित्रकर्ती कांचन महंते यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन दिनांक ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान जुहु येथील ईसल आर्ट गैलरीत सुरु होत आहे. ते रसिकांना सकाळी ११ ते रात्री ७ वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे.
चित्रकर्ती कांचन महंते यांनी आपल्या वैविध्यपूर्ण शैलीचे कलात्मक दर्शन सर्व रसिकांना आपल्या कलामाध्यमातून दाखवले आहे. त्या निब चित्रकला, सार चित्रकला, फ्लोरल चित्रकला, पोट्रेट चित्रकला असे चित्रकलेचे वेगवेगळे प्रकार हाताळतात. त्यातही त्यांनी निब चित्रकला (टाके चित्रकला) मध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. या कला आविष्कारात अप्रतीम अश्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळणार आहेत.
कांचन महंते यांनी टाक वापरून अलंकारिक अशी चित्रनिर्मिती केली आहे. एका साध्या टाकाने विशेष चेहरे निर्माण करून त्यात भाव भरणे व त्यास योग्य रंगसंगतीने त्या कलाकृतीत प्राण ओतणे हे कांचन याचे वैशिष्ट्य आहे. या प्रकारातील एक कलाकृती साकारण्यासाठी साधारण दोन ते तीन महिने लागतात. या कलाकृती निर्माण करताना अतिशय दक्षता बाळगावी लागते कारण यात चुकीला दुसरा पर्याय नाही . त्यामुळे विशेष अशा चेह-यांना आकार देताना त्यात भाव भरताना अतिशय काळजी घेतली जाते. तरच या कलाकृतीला योग्य तो न्याय मिळतो.
कांचन या कलेविषयी म्हणतात की, ‘या प्रदर्शनाने अनेक कलाकारांना निबकलाविषयी माहिती मिळून ही कला बहुचर्चित होईल.’
कांचन यांच्या या २५ कलाकृतींचा संग्रह म्हणजे प्रेक्षकांना आनंदाची कला पर्वणी आहे . क्रेकल वर्क हा जो कलाकृतीचा प्रकार आहे तो पाहिलान्दाच सर्वांपुढे येत यात अत्यंत प्रभावी तसेच आकृती प्रधान क्रेकल पेंटिंग आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या पेंटिंगजमध्ये वेगळ्या आकारातून तसेच रंगसंगतीतून उर्जा व शांततेचे प्रतिक आपल्याला अनुभवायला मिळते. सोनेरी, लाल, काळा, नारिंगी, तपकिरी रंग आपल्याला अनोख्या अशा भावनेशी जोडतात. भगवान गौतम बुद्धा आणि श्री गणेश यांच्या टाक कलेने साकारलेल्या कलाकृती म्हणजे एका सात्विक आनंदाचा साक्षातकार होय. ही वेगळी अनुभूती उर्जा, दिव्या, अनंत, फोकस, मोक्ष, शांतम, तेजोमय आणि समर्पण या मालिकेत आपल्याला अनुभवायला मिळेल. टाक कलाकृतीआणि त्यातील तंत्र त्यामुळे बुद्धाच्या चेह-यातील जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतो.
