डॉ. आनंद देशपांडे यांचे ‘दे आसरा फाउंडेशन’
व्यवसाय सुरू करून सुरळीत चालविण्यासाठी फक्त भांडवल नाही तर अनुभव व मार्गदर्शनाची समाजातील गरज ओळखून पर्सिस्टंट सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी “दे आसरा फाउंडेशन” या ना नफा तत्वावर कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. विविध सेवा क्षेत्रात स्वत:च्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या तरुणांना, उद्योजकांना सहकार्य करणारे एक व्यासपीठ म्हणून हे फाऊंडेशन काम करते आहे.
गुरु हा सर्वांसाठीच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक असतो. पहिले पाऊल उचलताना पालकांचे, शाळेतल्या शिक्षकांचे, खेळांमध्ये प्रशिक्षकाचे असे आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यांवर अनेक तज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला मिळते आणि त्यामुळे मोठ्यात मोठी आव्हाने पेलण्याची शक्ती मिळते.
नोकरी करत असतांनाही वरिष्ठ अधिकारी सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतात, परंतु स्वतः व्यवसाय करत असतांना समोरील खडतर वाट मात्र आपण एकटेच तुडवत असतो. अनेक वर्षे एकच व्यवसाय करून देखील नफा तितकाच राहून खर्च मात्र वाढत असतात, पण व्यवसायात काय बदल करावे हे लक्षात न आल्याने तोच व्यवसाय त्याच परिस्थितीत करणारे अनेक उद्योजक अवतीभवती असतात किंवा भोवताली व्यावसायिक वातावरण नसल्याने आपली संकल्पना सत्यात यशस्वी होऊ शकेल का नाही या व्दिधा मनस्थितीमुळे व्यवसाय चालू करण्याचे धाडसही न करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यवसायात मार्गदर्शकाची अर्थात गुरुची उणीव.
आपण उद्योग करणार म्हणजे नेमके काय करणार, कसा करणार आणि त्यातून आपणास काय साध्य करायचे आहे, याची स्पष्टता संभाव्य उद्योजकाकडे असायलाच हवी.
अशी स्पष्टता असेल तर उद्योजकता हे आपल्यासाठी सहज साध्य ध्येय ठरु शकते. केवळ पदवी असल्याने त्याविषयातील सखोल ज्ञान असतेच असे नाही. तसेच, मनात काही कल्पना आहेत म्हणून उद्योजक बनता येत नाही. येथे आपल्या व्यक्तिमत्वाचा, दृष्टिकोनाचा खरा कस लागतो. आपल्या मर्यादा, उणीवा कोणत्याआहेत याचा आपल्याला स्वतःला अंदाज असतो. त्याची स्पष्टता मनात असायलाच हवी, तरच मार्गक्रमण सोपे होऊ शकते. उणीवांवर मात करणे सर्वस्वी शक्य नसले तरी स्वतःमधील क्षमतांचा विकास करणे, हे आपल्या हाती नक्की असते. मग, तसे केले तरी त्यातून मिळणारा आत्मविश्वास आपल्यातील उणीवांवर मात करण्यास मदत करु शकतो. ‘दे आसरा’ फाउंडेशनची मूळ संकल्पनाही सामान्य माणसाला यशस्वी उद्योजक बनवणे ही आहे त्यासाठी`स्वयंरोजगाराची कास धरू इच्छिणाऱ्यांना विविध टप्प्यांवर अनेकविध प्रश्न भेडसावतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘दे आसरा’ या उद्योजकांच्या बरोबर उभे राहते. व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सर्व माहिती व योग्य ती मदत ‘दे आसरा फाउंडेशन’ एकाच छताखाली उपलब्ध करून देते. व्यवसाय क्षेत्रात चाळीसहून अधिक वर्षांचा अनुभव असणारे वरिष्ठ अधिकारी, बँकेचे उच्चाधिकारी हे दे आसरामध्ये मार्गदर्शकाचे काम करतात. या मार्गदर्शकांच्या अनुभवाचा फायदा घेऊन विविध क्षेत्रातील अनेक उद्योजकांनी स्वतःचे उद्योग उभारले आहेत. व्यवसायात योग्य मार्गदर्शक असेल तर यशप्राप्तीची खात्री असते. आपल्या व्यावसायिक यशाची खात्रीकरण्यासाठी आजच संपर्क साधा. दे आसराच्या संपूर्ण संकल्पनेची माहिती www.deasra.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे.
दे आसरा फाउंडेशन. ०२०-६५३६५३००/११.