‘व्हाट्सअॅप’ ग्रुपने एकत्र आले वैदर्भीय
विदर्भातून आपले शहर सोडून मुंबईत टी व्ही आणि सिनेक्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने रसिकांच्या मनात हक्काचे घर बांधणाऱ्या कलावंतांचे स्नेहमिलन अलीकडेच उत्साहात साजरे झाले.

हा योग जुळून आला तो विदर्भातील कलावंतांच्या ‘व्हाट्सअॅप’ ग्रुपने. काही वर्षांपूर्वी नरेंद्र मुधोळकर यांच्या मनात एक कल्पना आली. विदर्भातील सगळ्या लोकांना एकत्र एका प्रोजेक्टमध्ये घेवूया किंवा याची एक यादी करुया. त्यासाठी ‘व्हाट्सअॅप ग्रुप’ तयार झाला २३ मार्च २०१४ मध्ये, एक एक करत ‘व्हाट्सअॅप’ ग्रुपमध्ये जवळ पास २०० हून अधिक लोक सामील झाले, जे मुंबईमध्ये गेली कित्येक वर्ष आहेत. मोठमोठ्या प्रोजेक्टचे भाग आहेत. नरेंद्रच्या प्रयत्नाला साथ दिली ती पराग भावसार आणि उल्हास फाटे यांनी, जे ग्रुपचे नव्याने अड्मीन आहेत. त्यांच्या पुढाकाराने गुपमध्ये आणखी लोक दाखल झालीत आणि ग्रुप छान मोठ्ठा झाला,
महत्वाचे म्हणजे सर्वांनी ग्रुपचे काही नियम पाळले. उगाच काहीही मेसज फॉरवर्ड करू नये, कामाच्या संदर्भात बोलणे, ग्रुपवर सैदव सकारात्मक विचार मांडणे, नव्या उमेदीच्या व्यक्तीला सहकार्य करणे, विदर्भातून आलेल्या कलाकाराला मार्गदर्शन करणे अशा काही गोष्टी गुपने नित्यनेमाने पाळल्यात. अनेक सामाजिक संदेशसुद्धा ह्या ग्रुपमधून दिले जातात, यंदा ग्रुपने ‘कोरड्या होळी’चा आग्रह धरला होता. ती करण्यात आली होती.

२३ जुलैला मुंबईमध्ये जणू विदर्भ अवतरला होता. त्या मागे कारणही असेच होते. ‘व्हाट्सअॅप’च्या माध्यामातून भेटलेले सगळे वैदर्भीय गेल्या विकेंडला भेटले. लोकवर्गणीतून साकारलेल्या या स्नेहसंमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, गीतकार, संगीतकार, कला विभाग अश्या सगळ्या विभागातील लोक या सोहळ्यात सहभागी झाले. सर्वांची चित्रफितीद्वारे ओळख करण्यात आली.
या सोहळयात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत केले.
कुणी म्हणाले घरी आल्यासारखे वाटले,
कुणी म्हणाले लग्न समारंभासारखे वाटते,
कुणी म्हणाले असां योग जुळवून येईल, असे कधी वाटलेच नाही,
कुणी म्हणाले आपल्या विदर्भातील इतके लोक मुंबईत आहे ह्याचा अभिमान आहे,
कुणी म्हणाले सगळे मिळून एखादे प्रोजेक्ट करुया.
बऱ्याच जुन्या लोकांना आपले मित्र अनेक वर्षानंतर इथे भेटले,

यंदाच्या स्नेहसंमेलनमध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावर चित्रपट विभागात पुरस्कार आणि नामांकन मिळविणारे कलाकार होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने समृद्धी पोरे दिग्दर्शक ( मला आई व्यायचे आणि डॉ. प्रकाश बाबा आमटे, महेश आणे छायाचित्रण (स्वदेश), शंतनू रोडे दिग्दर्शक ( जय जयकार आणि संवाद बाबू ब्यांड बाजा), समिधा गुरु अभिनय (कापूस कोंड्याची गोष्ट), बाबा खिरेकर रंगभूषा (तानी), नाना आंबुलकर रंगभूषा (ख्वाडा), अजय ठाकूर निर्माता (तानी), गायत्री कोलते कथा (तानी), अशोक लोखंडे अभिनय (युगपुरुष यशवंत राव चव्हाण), माधुरी अशिरगडे लेखक (आईशप्पत), नरेश भोईर आणि अजय बोढारे निर्माते (ती), मिलिंद उके निर्माता दिग्दर्शक (देवकी) आणि भारत गणेशपुरे अभिनेता या सर्वांचा गौरव झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगला भावसार यांचे शात्रीय नृत्य सादर झाले. शेवटी सुगम संगीताचा कार्यक्रम झाला, त्यात प्राध्यापक डॉ. कुणाल इंगळे. श्यामप्रसाद क्षीरसागर यांचे गझल गायन झाले आणि धनश्री देशपांडे यांच्या गीताने ही मैफिल यादगार झाली.