अतुल व प्रियाच्या अभिनयाची केमिस्ट्री
आजच्या युवा पिढीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या हॅप्पी जर्नी या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचा आस्वाद येत्या रविवारी ३१ जुलैला दुपारी १२ वा. व सायं ६ वा. झी टॅाकीजवर प्रेक्षकांना घेता येणार आहे.
भावा-बहिणीच्या वेगळ्या नात्यावर आणि कथेवर आधारित हा चित्रपट भावाबहिणीमध्ये असलेली भन्नाट केमिस्ट्री आणि सुंदर इमोशन्सचा उलगडा सुरेखरित्या करतो. याआधी सिनेमांमधून समोर आलेल्या नात्यापेक्षा हॅप्पी जर्नी निश्चितच वेगळा सिनेमा असून एका घटनेनंतर भावा-बहिणीचं निखळ नातं कसं फुलत जातं याचा सुरेख प्रवास हॅप्पी जर्नी मधून उलगडणार आहे.
अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष, सिद्धार्थ मेनन, चित्रा पालेकर, सुहिता थत्ते, माधव अभ्यंकर या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या ‘हॅप्पी जर्नी’त अतुल व प्रियाच्या अभिनयाची केमिस्ट्री पाहता येणार आहे.