चिल्ड्रेन्स थिएटर अकादमीची निर्मिती
गेली २७ वर्ष बालनाट्याद्वारे मुलांचे मनोरंजन करणा-या राजू तुलालवार यांनी आता तीन शॉर्टफिल्मची निर्मिती केली असून, ६ ऑगष्टला संध्याकाळी ७-३० वा.घाणेकर नाट्यगृहात या लघुपटांचा खास शो ठाण्यातील बालप्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

मॉनिटर, कट्टी-बट्टी, हसवणारी मुले… या शीर्षकांचे हे बालचित्रपट मुलांबरोबर पालकांनाही आवडतील असेच आहेत.
मुलांवर आधारीत सिनेमांची संख्या नगण्य आहे. टीव्हीवर कार्टून चैनल व्यतिरिक्त मुलांसाठी अन्य प्रकारचे मनोरंजन उपलब्ध नाही. बालनाट्य मुलांचे मनोरंजन करते. पण सगळीच मुले बालनाट्य बघत नाहीत. शिवाय अनेक गोष्टी बालनाट्यातून दाखवणे शक्य होत नाही, म्हणून राजू तुलालवार यांनी आता तीन शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.

ठाण्यात मुलांच्या शॉरिटफिल्मचे अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन असून ज्यांना ह्या फिल्म बघायच्या असतील त्यांनी विनामूल्य प्रवेशिकांसाठी 7208887503 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.