गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले; चित्रिकरणही सुरु होणार
दाक्षिणात्य चित्रपट निर्माते राघवेंद्र राव यांच्या ‘आरएसआर फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या ‘मातृ देवो भव’च्या गाण्यांचे रेकॉर्डिंग नुकतेच करण्यात आले. या चित्रपटाला पीयूष कश्यप यांचे संगीत असून, अक्षत व सायली पंकज यांनी गाणी गायली आहे. गीतरचना मुकुंद सोनवने यांची आहे.

या चित्रपटानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेती मिताली वराडकर व किशोर कदम पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. दिग्दर्शक कृष्णा चिलुका यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘मातृदेवोभव’मध्ये प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी अनुभवयास मिळणार आहे. या चित्रपटात अजून दोन दिग्गज कलाकार म्हणजे अविनाश नारकर व मौसमी तोंडवलकर हेसुद्धा असणार आहेत.

राघवेंद्र राव यांची मराठीतील ही पहिली निर्मिती असून, त्यांना मराठी चित्रपटाविषयी नेहमी कुतूहल व आपुलकी वाटायची, म्हणून त्यांनी ‘मातृदेवोभव’ची निर्मिती करण्याचे ठरविले. सदर चित्रपट जरी मराठी असला तरी त्याचे बनावट एका दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे असावी म्हणून त्याचे शुटिंग दक्षीणेतच होणार असल्याचे संकेत निर्मात्यांनी दिले.
‘मातृ देवो भव’चे संवाद व पटकथा क्षितिज झारपकर यांनी लिहिली असून, नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी संतोष भांगरे पार पाडत आहेत. लवकरच ‘मातृ देवो भव’ची शूटिंग सुरु होत असून, संपूर्ण चमू एकदम उत्साही असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.