१२० कलावंतांनी सादर विविध कलाविष्कार
वैविध्यपूर्ण भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरा रुजवण्यासाठी विवेकानंद एज्युकेशन कॉलेजच्या आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) विभागाने वार्षिक रागा सांस्कृतिक महोत्सव साजरा केला.
६ ऑगस्ट रोजी झालेल्या महोत्सवाची यंदाची मध्यवर्ती कल्पना, ‘गौरव मायभूमीचा’, महाराष्ट्रातील समृद्ध परंपरा आणि परफॉर्मिंग आर्टचे विविध प्रकार यांची दखल घेणे, अशी होती.
या महोत्सवात, १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आणि रोटरी सदस्यांकडूनही यास भरभरून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य, नाटक व संगीत यावर आधारित कार्यक्रम सादर करून आपले कलागुण दर्शवले.
एका नाटकामध्ये शिवाजी महाराज यांचे जीवन व काळ साकारण्यात आला. आणखी एका नाटकात, सलिम नावाचे मध्यवर्ती पात्र उज्ज्वल भवितव्यासाठी गावाकडून शहराकडे येते. यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व, तसेच विविध जाती व वर्गांचे एकत्रित वास्तव्य अधोरेखित केले आहे. गणेशोत्सवाचे नाट्यमय रूपांतर सादर करण्याबरोबरच, या महोत्सवात जोगवा, गोंधळ, लवणी, पारंपरिक मराठी प्रार्थना आणि कोळीनृत्य यांचाही समावेश होता. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते, मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असलेल्या शेतकरी समुदायाची दयनीय स्थिती दर्शवणारा माइम परफॉर्मन्स.
”आम्ही गेली १३-१४ वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठीचा हा खास प्रयत्न आहे. हा महोत्सव दरवर्षी विविध सांस्कृतिक संकल्पनांवर आधारित असतो. या महोत्सवाचे उद्दिष्ट, अत्यंत वैविध्यपूर्ण असलेल्या भारतीय संस्कृतीची जोपासना करणे, हे आहे. यामुळे सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यातील उदयोन्मुख नाटक कलाकार, गायक व संगीतकार यांना व्यासपीठ मिळणार आहे.”
-प्रा. डॉ. शिखा दत्ता,
बीएमएम विभाग प्रमुख,
व्हीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स