ठाण्यात सोनालीच्या हस्ते मॅक्स विंटर कलेक्शन लाँच
स्टाईल स्टेटमेंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेली मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘नटरंग’मधील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी गुरुवारी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये आली आणि आपले फॅशन फंडे चाहत्यांसाठी खुले केले आहे.

‘मी आज मॅक्सचं कलेक्शन लाँच करतेवेळी मॅक्सच्या स्टायलिश तसेच कंफर्टेबल असलेल्या क्लोट्स आणि जॅकेट्सची निवड केली. मॅक्सचे आउटफिट्स मला कायम आवडतात आणि याच ब्रॅण्डला मी प्रेझेंट करते आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. मॅक्सच्या बोहेमिन कलेक्शनचं लुकबुकमध्ये माझ्या आवडीचे कलेक्शन आहेत, मी जीसिम्सची खूप आभारी आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे मी आज मॅक्सचं ऑटम विंटर लुकबुक लाँच करते आहे,’ असे सोनालीने यावेळी सांगितले.


सोनालीने रिव्हिल केलेलं ऑटम विंटर कलेक्शन मॅक्सच्या सर्वत्र स्टोअरमध्ये चाहत्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या सोनालीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी या पहिल्याच मराठी अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसाठी विंटर कलेक्शन लाँच केले आहे. तिच्या स्टाईलची क्रेझ आज तरुणींमध्ये जास्त असल्याकारणामुळे मॅक्स स्टोअरमध्ये होत असलेल्या ऑटम विंटर कलेक्शनला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कलेक्शनबद्दल…

मॅक्सबद्दल…
मॅक्स हे एक अग्रगण्य फॅशन ब्रँड आहे, जे ग्राहकांना संपूर्ण कुटुंबसाठी कपडे, ऍक्सेसरिज अणि पादत्राणे विकत घेण्यासाठी वन स्टॉप शॉप आहे. मॅक्स, लॅंडमार्क समुहाचा फॅशन ब्रँड आहे, ज्यांनी भारतात ‘उपयुक्त दरांमध्ये नवीनतम फॅशन’ची संकल्पना अग्रेसर केली आहे. मॅक्स ग्राहकांना आंतरराष्ट्रीय फॅशन आणि दर्जासहित मोठी निवड प्रक्रीया उपलब्ध करुन देत आहे. हे पोषाख, पादत्राणे आणि नवीनतम ट्रेंड प्रदान करते. स्टोअर परिसरात आंतरराष्ट्रीय खरेदीचा अनुभव मिळतो. ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला खरेदी म्हणजे एक परिपूर्ण आनंद प्रदान करतो. जागतिक स्तरावर मॅक्सचे भारतात आणि इतर १६ देशांमध्ये ३५० स्टोअर्स आहेत. ६० हून अधिक शहरांत मॅक्सचे १५० स्टोअर्स आहेत. वित्तीय वर्ष २०१६-२०१७ च्या अखेरीस मॅक्स सबंध भारतात १६० स्टोअर्सचे नेटवर्क निर्माण करणार आहे. जीएसएसईएएमएसबद्दल: मराठीसृष्टीतील सर्वात जलद वाढत असणारे स्टुडिओ – जे चित्रपट, टेलिव्हिजन प्रॉडक्शन, फिल्म मार्केटिंग-प्रमोशन आणि टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी आहे.
लॉंचिंग सोहळ्यापूर्वी ग्राहकांसाठी रंजक स्पर्धा
मॅक्स विंटर कलेक्शन लाँच सोहळा सुरु होण्यापूर्वी विवियाना मॉलमध्ये मॅक्सच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या रंगतदार स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिंकणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट व्हाउचर देऊन त्यांचा खरेदीचा उत्साह वाढवण्यात आला.