१५ ऑगस्टला आयोजन
मुंबईतील ‘संगोपन फाऊडेंशन ट्रस्ट’ तर्फे पाळीव प्राण्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
गेली ११ वर्ष ‘संगोपन’ ही संस्था प्राणीमित्रांची अविरत सेवा करत आहे. संगोपन फाऊडेंशन ट्रस्टने यंदाच्या ६९ व्या स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून प्राण्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे. हे शिबिर परेल पूर्व, केईम हॉस्पिटल रुग्णालयाच्या पाठीमागे, गुरुराणी नागकन्या चौक, सकाळी ९ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान होणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची मोफत तपासणी होणार आहे.
मूक प्राण्यांची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा करण्यासारखेच आहे. गेल्या वर्षी या उपक्रमामधून ८०० हून अधिक प्राण्यांना फायदा झाला होता. या वर्षी अधिका अधिक प्रणिमात्रांना या उपक्रमाचा उपयोग व्हावा अशी आमची इच्छा आहे. या करीत प्राणी प्रेमींनी आपल्या प्राण्यांना घेऊन या मोफत आरोग्य शिबिरास भेट द्यावी व त्याचा जास्त जास्त फायदा करून घ्यावा असे आव्हान संगोपन फाऊडेंशनचे संस्थापक विशाल पाटील यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- विशाल ९९६७०६७३१६