फ्रेश जोडीचे फ्रेश गाणे!
तारुण्याने बहरलेल्या हृदयात जेव्हा प्रेमाची पालवी उमलते तेव्हा आयुष्य खूप सुंदर होते, म्हणूनच आयुष्यात प्रेम गरजेचे असते, प्रेमाची हीच परिभाषा आगामी ‘फोटोकॉपी’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस या फ्रेश जोडींवर आधारित असलेले हे फ्रेश गाणे तरुणांईंना भुलावत आहे.

पुण्यातील लवासा येथील प्रशस्त आणि अल्हादायी वातावरणात चित्रित केले गेलेल्या या गाण्याचा तजेला प्रेक्षकांना मदमस्त करणारा ठरत आहे.

सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. पर्ण आणि चेतन या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.