एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिक अवार्डचे वितरण


सिने कलावंतांच्या उपस्थितीने बहरलेल्या या सोहळ्यात वेंगसरकर, धनराज पिल्ले या खेळाडूंनीदेखील विशेष उपस्थिती लावली होती. क्रीडाक्षेत्रात विशेष कर्तृत्व गाजवल्यानिमित्त या दोघांचादेखील सन्मान करण्यात आला. फिटनेस तज्ञ मिकी मेहता यांना फिटनेस गुरु या नावाने सन्मानित करण्यात आले.
बॉलिवूडचा गोल्ड मेन बप्पी लहरी यांना एव्हरग्रीन म्यूजिकल जिनियस या उपाधीने गौरविण्यात आले. धर्मेंद्र यांना ‘गॉड ऑफ सिल्वर स्क्रीन’ हा सन्मान देण्यात आला. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना डिरेक्टर विथ डिफरंटने तर कोरियोग्राफर रेमो डिसुझा यांना इन्स्पिरेशन फॉर मिलियनची उपाधी देत गौरविण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा केळकर आणि प्रसाद फणसे यांनी केले. पुष्कर जोग, अंकिता तारे, सिद्धेश पै, सॅटरिक डीसुजा, सुकन्या काळन आणि मानसी नाईक हिच्या डान्स परफोरॅमनसने कार्यक्रमात जान आणली.. धनश्री देशपांडे, सुप्रिया जोशी या गायकामुळे सोहळा सुरमय वातावरणात पार पडला. संजय लोंढे यांच्या शांताबाई या गाण्याने प्रेक्षक थिरकले.