तरुणाईचे भावविश्व टिपणारा ‘फोटोकॉपी’
पाऊस आणि प्रेमाचे नाते सांगणारा ‘ओली ती माती’ हे गाणे प्रत्येकांच्या ओठी ऐकायला मिळत आहे. व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या आगामी चित्रपटातील हे गाणे रसिकांना आपल्या संगीतमय सुरात ओलेचिंब करणारा आहे.


सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. या सिनेमात पर्ण दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार असून, चेतन चिटणीस नावाचा गोंडस चेहरा यांमार्फत लोकांसमोर सादर होत आहे. या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.