ग्राफिकल ड्रॉईंगचे १ सप्टेंबरपासून प्रदर्शन

अशोक नामदेव हिंगे यांनी हे चित्रित करण्यासाठी एका आगळ्या-वेगळ्या आकाराचा वापरकेला आहे, त्यांनी इंग्रजीतील कॉमा (मराठीतील स्वल्प विराम) या विराम चिन्हांचा वापर करून आपल्या चित्रात अनेक विषय मांडले आहेत.

अशोक हिंगे यांनी कॉमा हा अतिशय कल्पकतेने जीवनातील वेगवेगळ्या घटना दर्शवण्यासाठी आपल्या चित्रात एकदम वेगळ्या पद्धतीने वापरला आहे. चित्रकाराने कॉमाचा वापर करून समाजातील घटना, धर्म, जीवनशैली, व्यवसाय, नाती, सामाजिक विषय व संदेश . दर्शवले आहे. म्हणूनच कॉमा हा जीवन आणि पूर्ण मानवी अस्तित्वाचे एक सर्वोच्च प्रतीक चित्रित केले आहे असे दिसते.
‘कॉमास्केपस’ या चित्रमालिकेतील प्रत्येक चित्र हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असल्याचे दर्शन होते.
‘कॉमास्केपस’ हे प्रदर्शन डिनोडिया 1×1 आर्ट गॅलरी, नरिमन पॉईंट, मुंबई येथे १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत सर्वकलारसिकांसाठी खुली राहील.