दत्तात्रय ठोम्बरे, चारुशीला गावडे यांचे रंगलेखन
सुप्रसिद्ध रंगलेखक दत्तात्रय ठोम्बरे आणि चारुशीला गावडे यांच्या चित्र कलाकृतींचे चित्रप्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये मांडण्यात येणार आहे. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी (ए.सी.), डिस्कव्हरी ऑफ इंडीया बिल्डींग, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी येथे ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सदर प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुलं राहील.
चित्रकार दत्तात्रय ठोम्बरे यांनी अलिकडच्या काळात ऍक्रिलिक रंगात चारकोलमध्ये साकार केलेल्या चित्रकृती सदर प्रदर्शनात मांडल्या गेल्या आहेत. आंतरीक प्रेम’, ‘प्रवास’, ‘प्रतिबिंब’, ‘बालपणीच्या रम्य आठवणी’ असे अनेक विषय त्यानी या प्रदर्शनात हाताळले आहेत. या चित्रांमधून मानवी भावभावना आणि उत्कट नात्यांचा प्रत्यय येतो. कलाकाराचं हळवं मन घेऊनच जन्माला आलेले चित्रकार दत्तात्रय ठोम्बरे यांनी आपलं कला शिक्षण मुंबईच्या जे.जे. स्कुल ऑफ आर्ट आणि अभिनव कलामहाविद्याल पुणे येथून पूर्ण केलं.
मुंबईस्थित चित्रकार चारुशीला गावडे यांनी आजपर्यंत अनेक एकल आणि समूह चित्रप्रदर्शनात भाग घेतलाअसून, त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जगभरातील कलारसिक आणि कला दालनांमध्ये तसंच अनेक कोर्पोरेट ऑफिसमध्ये त्यांची चित्रं प्रदर्शित केली गेली आहेत. सदर प्रदर्शनात त्यानी हत्तीची अनेक रुपं आणि विषय हाताळले आहेत. देव, गजेन्द्र, ऎरावताचा हत्ती, खानदानी कुटुंबाचा हत्ती, पांढरा हत्ती अशी हत्तीची अनेक रुपं या दालनात पहायला मिळतील.
चित्रकलेला वाहून घेतलेल्या या कलाकारांच्या चित्रांचं सदर प्रदर्शन आवर्जून पहावं असं आहे.