सप्टेंबरअखेरीस अकलूजमध्ये रंगणार सामने


लगोरी म्हंटलं की सर्वानाच आपले बालपण आठवते. या खेळाशी प्रत्येकाचे काही ना काही नाते असतेच. लगोरी .. डिकोरी… लगूरी अशा अनेकविध नावानी या खेळाला ओळखले जाते. ‘लगोरी’ हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही कारण याचे काही पौराणिक संदर्भसुद्धा मिळतात. शिवाय या खेळाला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे.

उद्घाटनप्रसंगी प्रसाद ओक आणि संजय नार्वेकर यांनी रंगमंचावर लगोरीचा खेळ खेळून सामन्याला सुरुवात केली. या क्रीडा मालिकेचे शीर्षक गीत संगीतकार रोहन – रोहन यांनी केले आहे.
सहभागी होणारे कलावंत
संजय जाधव, प्रसाद ओक, संजय नार्वेकर, अभिजित पानसे, सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, हेमांगी कवी, केदार शिंदे, संग्राम साळवी, आदिनाथ कोठारे, मनीषा केळकर, श्रुती मराठे असे अनेक मान्यवर कलाकार खेळणार आहेत.
टीम्सची नावे
रांगडा रायगड, सरखेळ सिन्धुदुर्ग, अभेद्य अकलूज, नरवीर सिंहगड, पावन पन्हाळा, सरदार शिवनेरी, झुंजार राजगड, बुलंद प्रतापगड.