‘दामले सफारीज’चं अनोखं सीमोल्लंघन
वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या ‘दामले सफारीज’तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘केपटाऊन ते कैरो’ अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.

युरोप आणि अमेरिकेतील मोजक्याच लोकांनी केलेला हा प्रवास प्रथमच भारतीयांकडून होत आहे. दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, झाम्बिया, टांझानिया, केनिया, इथिओपिया, सुदान व इजिप्त अशा ८ देशांतून १२,८०० कि.मी.चा हा प्रवास केला जाणार आहे.
अतिशय दुर्गम प्रदेश, वन्यजीवन पार्कस आणि वाळवंटी प्रदेशातून प्रवास करतांना काफ़ूवे नॅशनल पार्क, नक्सी पॅन नॅशनल पार्क पासून नाईल नदीच्या परिसरातून प्रवास होईल. व्हिक्टोरिया फॉल्स, ग्रेट रिफ्ट व्हॅली, गिझा पिरॅमिड अशा जगप्रसिद्ध वास्तूही या प्रवाशांना पाहायला मिळतील.
‘अतुल्य भारत’ची प्रसिद्धी करणाऱ्या या दौ-याचे ब्रीदवाक्य आहे, friendship drive across Africa.