रंगलेखक रघु नेवरे & गणपत भडके यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु

या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार रवि मंडलिक, प्रकाश राजेशिर्के व नीना रेगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी, ७ सप्टेंबर रोजी झाले. या प्रदर्शनात रघु नेवरे यांच्या
तैलरंगातील अमूर्त शैलीतील रंगलेखनाचा आस्वाद रंगप्रेमींना घेता येणार आहे. गणपत भडके यांनी देखील नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळ्या अमूर्त कलाकृतींची मांडणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने पेश केली आहे.

मुंबईकर चित्रप्रेमींसाठी हे आगळे वेगळे प्रदर्शन १४ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.