लोकप्रिय लघुकथा सोनीलिव्हवर
आधुनिक काळातील कथांची शक्ती दर्शविण्याच्या हेतूने दर्शकांसाठी विविध शैलींमधील सामग्री सादर करणारा परिपूर्ण डिजिटल मंच सोनीलिव्हने त्यांचा नवीनतम शो ‘वन्स अपॉन अ टाईम विथ विक्रम भट्ट’ दाखल केला आहे.
प्रतिष्ठित कथाकार व दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आलेल्या या वेब सीरिजमध्ये विक्रम भट्ट त्यांनी स्वतः लिहिलेल्या काही लोकप्रिय लघुकथांना सादर करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून विक्रम भट्ट संबंधित लघु-स्वरूपातील सामग्रीच्या निर्मितीद्वारे लाखो दर्शकांना आकर्षित करण्याचा सोनीलिव्हचा प्रयत्न असणार आहे.
१०४ भागांचा या अनोख्या शोची सुरुवात ८ सप्टेंबर रोजी झाली असून, दर सोमवार आणि मंगळवारी सोनीलिव्हच्या वेब आणि मोबाईल मंचावर याचे प्रसारण करण्यात येईल.
विक्रम भट्ट हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आहेत, ज्यांच्या नावे गुलाम, राझ, १९२० व आगामी चित्रपट राझ रिबूट असे चित्रपट आहेत. यासोबतच पौराणिक, हॉरर, जासूसी कथा, सामाजिक समस्या, वैयक्तिक नातेसंबंध व तत्वे यांवर आधारित लघुकथांचे लेखन करण्यासोबतच त्या शेअर करण्याकरिता प्रसिद्ध असलेल्या विक्रम भट्ट यांना त्यांच्या निर्मितीकरिता सोशल मीडियाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सोनीलिव्हचे इव्हीपी आणि डिजिटल व्यवसाय प्रमुख उदय सोधी यांनी सांगितले की, ‘आम्ही आमच्या दर्शकांसाठी नेहमीच सर्वोत्तम व्हिडीओ मनोरंजन सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वन्स अपॉन अ टाईम विथ विक्रम भट्ट’ हा शो याच दृष्टिकोनाला अधोरेखित करतो. विक्रमच्या अभूतपूर्व व जीवनाशी संबंधित कथांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आम्ही आधुनिक काळातील लाखो दर्शकांच्या मनोरंजनामध्ये भर करण्याकरिता आणि कथाकथनाचे नवे स्वरूप दाखल करण्याकरिता या कथांना व्हिडीओ-आधारित स्वरूपात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.’