मुंबई विद्यापीठातील अकॅडमी आॅफ थिएटर आर्टमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, नाट्यप्रेमी रसिकांना उत्कृष्ट नाटके पाहण्याची संधी १८ सप्टेंबरपासून मिळणार आहे. त्याच्या निःशुल्क प्रवेशिका देण्याचे १५ सप्टेंबरपासून सुरु झाले आहे.

देशाला समता, न्याय व बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने त्यांच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने मुुंबई विद्यापीठाचा अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस् हा नाटयशास्त्र विभाग, व्हाईस, दिल्ली व परिवर्तन फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिला ‘मेत्ता आंतरराष्ट्रीय नाट्यामहोत्सव २०१६’ मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय नाट्याोत्सवात भारतासह, श्रीलंका-रवांडा, अर्मेनिया, मोझांबिक, सेंन्ट्रल आफ्रिका रिपब्लिक, नेपाळ या देशातील नाट्याकृती सादर होणार आहेत.

या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे यावर्षी या नाट्यामहोत्सवाला जोडून दिनांक २२ व २३ सप्टेंबर रोजी ‘रंगवेध’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे ही आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारा हा उद्घाटन समारोह दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायं ७ वा. कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजकुमार बडोले, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेच्या उच्चायुक्त श्रीमती सरोजा सिरीसेना, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के, ज्येष्ठ सिनेनाटय दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. एम. ए. खान उपस्थित राहणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी श्रीलंका व रवांडा या दोन देशांनी मिळून केलेले ‘डियर चिल्ड्रेन, सिन्सीयरली…’ हे भव्य नाटक सादर केले जाणार आहे. अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस्, मुंबई विद्यापीठ, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्व’ या विषयावर आयोजित ‘रंगवेध’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार असून बीजभाषण राष्ट्रीय नाटय विद्यालय, नवी दिल्लीचे संचालक व सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे करणार आहेत. ह्याावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व नाटककार प्रा. अविनाश डोळस उपस्थित राहणार आहेत.

‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्वः लेखकांची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ नाट्यालेखक प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सत्रात ज्येष्ठ नाट्यालेखक हॅक सेकोयान (अर्मेनिया), ज्येष्ठ नाट्यालेखक शफाअत खान, ज्येष्ठ नाटयलेखक व संगीतकार संभाजी भगत, ज्येष्ठ नाटयलेखक व पटकथालेखक संजय पवार हे आपले विचार मांडणार आहेत.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी दिनांक २३ सप्टेंबरला सकाळी ११ वा. प्रथम सत्रात ‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्वः दिग्दर्शकांची भूमिका’ ज्येष्ठ सिनेनाट्या दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नेपाळ येथील ज्येष्ठ दिग्दर्शिका सुलक्षणा भारती, नाट्यालेखक व दिग्दर्शक अतुल पेठे, अभिनेत्री व दिग्दर्शिका सुषमा देषपांडे, नाट्यालेखक व नाट्यदिग्दर्शक तुषार भद्रे हे सहभागी होणार आहेत.
दुपारी २ वा. द्वितीय सत्रात ‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्वः कलाकारांची भूमिका’ ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक डाॅ. शरद भूथाडिया कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली अभिनेत्री डाॅली ठाकूर मुंबई, अभिनेत्री सरिता गिरी, नेपाळ, अभिनेता अशोक लोखंडे, मुंबई हे आपले विचार व्यक्त करणार आहेत.
या नंतरच्या दुपारी ४.३० वा. होणाऱ्या समारोपीय सत्राचे अध्यक्षस्थान अकॅडमी आॅफ थिएटर आर्टसचे प्र. संचालक व लेखक व नाट्यादिग्दर्शक प्रा. डाॅ. मंगेश बनसोड हे भूषविणार असून या सत्रात ‘निरिक्षकांची भूमिका’ या सत्रात लेखक-दिग्दर्शक व समीक्षक श्रीधर तिळवे, मुंबई, लेखक- समीक्षक प्रा. डाॅ. अनिल सपकाळ, मुंबई, अभिनेत्री व रंगकर्मी अनघा देशपांडे, गोवा, ज्येष्ठ रंगकर्मी कमल वाघधरे, नागपूर, ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्याप्रशिक्षक प्रा. रामचंद्र शेळके, नांदेड, ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्याप्रशिक्षक प्रा. संध्या रायते मुंबई, हे निरीक्षक संबंध चर्चासत्रावर आपली निरीक्षणे नोंदविणार आहेत.
निःशुल्क प्रवेशिका मिळणे सुरु
दि. १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या या सात दिवसाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात चर्चासत्रे, नाटकाशी संबंधित विविध कार्यशाळा, मास्टर क्लास, डायरेक्टर्स मीट अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असून या विनामूल्य चर्चासत्र व नाटयोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस्चे प्र. संचालक प्रा. डाॅ. मंगेश बनसोड यांनी केले आहे.
सदर महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका दिनांक १५ सप्टेंबरपासून सकाळी ११ ते ५ या कालावधीत अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस् मुंबई विद्यापीठ, २ रा मजला, डाॅ. बाबसाहेब आंबेडकर भवन, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी प्रा. संध्या रायते 9819184154, प्रा. मिलिंद इनामदार 9820686506 प्रा. अमोल देशमुख 9325340706 या क्रमांकावर संपर्क साधावा.