उज्ज्वल निकम यांच्या कार्याला समर्पित चित्रपट
‘आदेश–पॉवर ऑफ लॉ’ या चित्रपटाचा म्युझिकलॉन्च सोहळा नुकतच हॉटेल ऋषी, दादर येथे संपन्न झाला. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या कार्याला समर्पित केलेला चित्रपट “आदेश – पॉवर ऑफ लॉ” दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
अॅडव्होकेट आदेश सरोदे, एक गरीब कुटुंबातील मुलगा. आपल्या मेहनतीच्या आणि हुशारीच्या जोरावर कमी काळात प्रसिद्द होतो. त्याला सरकारकडून खूप महत्वाच्या केसेस मिळत जातात. हैदर अन्सारी केसमध्ये अॅडव्होकेट आदेश सरोदे आपले सगळे कसब पणाला लावतात आणि ती केस जिंकतात. सरकार त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करतात.
सरकारी वकील आपल्या अशिलाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात, पण त्याचबरोबर त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे समजून घेण्याचा एकतर आपण प्रयत्न करीत नाही किंवा दुर्लक्ष तरी करतो.
योगेश वणवे (निर्माता) , उद्योजक पुणे यांनी श्री अंबिका माता प्रॉडक्शन या बॅनरखाली “आदेश – पॉवर ऑफ लॉ” या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सुवदन आंग्रे यांचा आत्तापर्यंतचा प्रवास हा सहदिग्दर्शक म्हणून तारे जमीन पर, द मिथ (हॉलीवूड), जोधा अकबर, ओम जय जगदीश तसेच बिल्लू उस्ताद या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रथमच ते एक वेगळा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत “आदेश – पॉवर ऑफ लॉ.
निर्मिती संस्था : श्री अंबिका माता प्रोडक्शन, निर्माता : योगेश वणवे, सहा निर्माता – कथा – दिग्दर्शन सुवदन आंग्रे, संवाद : गणेश महिंद्रकर छायाचित्रण : दिलीपकुमार डोंगरे, संगीत : श्रीरंग आरस, गीतकार : सचिन निकम, गायक : मिलिंद इंगळे, वैशाली सामंत, कविता राजहंस. लाईन प्रोडुसर : दिनेश पुजारी. प्रसिदी : स्वप्ना संत, सचिन शिंदे. कलाकार सुवदन आंग्रे, मुकेश तिवारी, अनंत जोग, अशोक शिंदे, योगेश वणवे, मिथिला नाईक यांनी भूमिका केल्या आहेत.