आदिरंग महोत्सवात नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे मत

२९ ते ३१ डिसेंबरदरम्यान ३ दिवस रंगलेल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या आदिरंग महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला अभिनेते नावजुद्दीन सिद्दीकी उपस्थित होते.
गेले तीन दिवस मुंबईकरांनी आदिरंग महोत्सवात लागलेल्या स्टॉल्सना आणि आदिवासींच्या कलांना प्रचंड प्रतिसाद दिला. या महोत्सवात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील सुमारे ७०० कलावंतांनी सहभाग नोंदवला. आपल्या कलेचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.