टियाना प्रोडक्शन्सची निर्मिती
आदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असून, ते गणेश निगडे यांनी स्वरबद्ध आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलं आहे.
‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती टियाना प्रोडक्शन्सने केली आहे. या गाण्याला अगदी कमी काळात रासिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलय.
पुणे स्थित टियाना प्रोडक्शन्सचे सुजित जाधव म्हणतात, ‘आम्ही युवा आणि महत्वाकांक्षी दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि प्रोड्यूसर्स असे एकत्र आलो आहोत. आमचा पहिला प्रकल्प मराठी संगीत अल्बम ‘प्रीत तुझी’ आहे, जो एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च होणार आहे. ‘संभळंग ढंभळंग’ हे ‘प्रीत तुझी’ अल्बममधील ४ गाण्यांपैकी एक गाणं आहे. आमचे बोधवाक्य मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार मनोरंजन तयार करणे आहे.’