अॅंबी व्हॅली सिटीचा विश्वविक्रम
अॅंबी व्हॅलीच्या डॉ. नरिंदर सिंग, सलील कुलकर्णी आणि तेज पांडे यांनी पाण्याखाली ५० मीटरपेक्षा अधिक खुल्या समुद्रात ३० फुट खोल सायकलिंगचा आणि फळे खाण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
सध्या अॅंबी व्हॅली सिटीवर बक्षिसे आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. इथे नुकतेच ‘क्लायमेट चेंजसाठी पाण्याखाली सायकलिंग’ असे अभियान चालविण्यात आले ज्यात अॅंबी व्हॅलीचे काही सदस्य सहभागी झाले होते आणि त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला.
सहभागींनी या गोष्टी ठरवलेल्या वेळेत केल्या. टीमच्या सदस्यांमध्ये रात्री एकमेकांच्या सकारात्मक बाबी आणि कमतरतांबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि दुसर्या दिवशी त्यात सुधारणा करण्यावर भर असायचा ज्यामुळे योग्य ठिकाणी एकमेकांशी सहकार्य निर्माण होतानाच परस्पर विश्वासही निर्माण झाला.
या प्रसंगी बोलताना चीफ जनरल मॅनेजर, गोल्फ, एचआर आणि प्रशासन, कलो सजल कुमार सिन्हा (निवृत्त) असे म्हणाले की “अशा अनोख्या पण अवघड गोष्टी साध्य करून विश्वविक्रम करणाऱ्या आमच्या टीमच्या सदस्यांपुढे आम्ही नतमस्तक आहोत. लक्ष्य साध्य करण्यासाठी पहिल्यांदाच टीमच्या प्रत्येक सदस्याने आपले सर्वस्व पणाला लावले असेल. अशा कार्यासाठी असलेल्या मोहिमेबरोबर जोडलेले असणे खूप अभिमानाचे आहे. टीम सहारा स्टार आणि अॅंबी व्हॅली सिटीतर्फे विजेत्यांच्या धैर्याला सलाम आहे.’