पी अँड जी कंपनीच्या टाईड या कपड्यांची काळजी घेणाऱ्या भारतातील एका अग्रणी ब्रँडने अतिशय प्रतिभावंत आणि अष्टपैलू आयुष्यमान खुरानाची त्यांचा भारतातील ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे. ही भागीदारी केल्यानंतर विशेष करून वॉशिंग मशीनसाठी तयार करण्यात आलेल्या टाईड अल्ट्रासाठी या अभिनेत्याला घेऊन त्यांनी त्यांची पहिली जाहिरात प्रदर्शित केली आहे. यात आयुष्मान चक्क बाई झाला आहे.
भारतात 2000 साली दाखल झालेल्या टाईडने ‘सर्वाधिक स्वच्छता’ देऊ करून कपड्यांची देखभाल करण्याच्या दृष्टीने अतिशय उच्च प्रतीचे मापदंड प्रस्थापित केले. घरगुती वापरातील कपडे हाताने धुण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या डिटर्जंटने मशीनमध्ये वापरता येईल अशी प्रगती केली आणि आता तर अल्ट्रा टाईड बाजारात आणून त्यांनी मशीनमध्येच डाग घालविण्यापर्यंत मजल मारली. टाईडने नेहमीच कपड्यांच्या देखभालीसंदर्भात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या विनोदी ढंगाच्या जाहिराती करून निखळ भारतीयत्व जपणारा ब्रँड निर्माण केला.
अतिशय आपल्या वाटणाऱ्या चित्रपटांची निवड करून आधीच लक्षावधी लोकांच्या मनात स्थान मिळवलेल्या आयुषमान खुरानाची या भागीदारीसाठीची निवड अगदीच योग्य म्हणता येईल. टाईडच्या नव्या जाहिरातीपासून या भागीदारीची सुरुवात होणार असून आयुषमान खुराना यात कुटुंबातील विविध सदस्यांच्या भूमिका मजेशीर आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वठवणार आहे. या अभिनेत्याने ही सर्वच व्यक्तिचित्रे अतिशय मोहक पद्धतीने रंगवली आहेत.“टाईड हा एक आयकॉनीक पॉवर ब्रँड आहे. त्यांच्या आणि माझ्या मूल्यांमध्ये मला साधर्म्य दिसते. लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून त्यांचे रोजचेच आयुष्य उजळण्यावर आम्हा दोघांचाही विश्वास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टाईडच्या विनोदी ढंगाच्या जाहिराती बघण्याचा आनंद मी घेतला आहे. या ब्रँडसोबत पहिली जाहिरात करताना आम्ही एकत्रितपणे अगदी वेगळी आणि खिळवून ठेवणारी जाहिरात करण्यासाठी आमचा अनुभव पणाला लावला. मी या जाहिरातीत कुटुंबातील वेगवेगळी व्यक्तिचित्रे मजेशीर पण आपुलकीच्या नात्यातून वठवली असल्याचे तुम्हाला दिसेल. आणि हो, ही तर फक्त सुरुवात आहे! टाईडसारख्या गमतीशीर ब्रँडसोबत जोडले जाणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे आणि जे काही आम्ही एकत्रितरित्या करणार आहोत त्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा आणि त्यांच्या मनात स्थान मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. -आयुषमान खुराना