रॉकी’मध्ये साकारणार संजना
छोट्या पडद्यावरील ‘सरस्वती’ या मालिकेत झळकलेली अक्षया हिंदळकर आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘रॉकी’ या आगामी अॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमात अक्षया आपल्याला नायिकेच्या रूपात दिसणार आहे.
संजना असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून शांत, सोज्वळ संजनाच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटना नेमकं काय वळण घेणार याची रोमांचकारी कथा म्हणजे रॉकी सिनेमा.
‘सेवेन सीज्’ व ‘ड्रीम विव्हर’ प्रोडक्शन्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अदनान शेख करीत आहेत. आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना अक्षया सांगते की, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. प्रत्येकाकडून बरंच काही शिकायला मिळतंय.
रोमान्स, फॅमिली ड्रामा व अॅक्शन याचे कॉम्बिनेशन असलेल्या या सिनेमात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, अक्षया हिंदळकर, संदीप साळवे, हिंदीतील अभिनेते राहुल देव हे कलाकार आहेत.
या चित्रपटाचे निर्माते मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर आहेत. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांचे तर संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान तर संगीत समीर साप्तीस्कर, वसीम सदानी व इम्रान सदानी यांचे आहे.

छोट्या पडद्यावरील अक्षया मोठ्या पडद्यावर!
on: In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सिने कलावंत