लघुपट हवेत ‘अवयव दान, देहदान’वर!
मराठी चित्रपटाचा विकास आणि प्रगतीमध्ये अंबरनाथ शहराचेसुद्धा योगदान असावे म्हणून ‘अंबर भरारी’चा अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. या फेस्टिव्हलची घोषणा झाली आहे. हे या महोत्सवाचे दुसरं वर्ष आहे.

‘अंबर भरारी’ या संस्थेने आयोजनाची सगळी जबाबदारी घेतली आणि पहिल्या वर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर आता दुसरा महोत्सव जाहीर करण्यात आला आहे.
ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत प्रदर्शित, अप्रदर्शित चित्रपटांना तसेच लघुपट, माहितीपट, आमंत्रित करून मान्यवर परीक्षकांच्या वतीने २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत चित्रपट पहिले जातील.
चित्रपटांच्या पुरस्कारांचे नामांकन ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील आणि २७ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. लघुपटासाठी यंदा ‘अवयव दान, देहदान’ याबद्दल जागृती निर्माण करणारे लघुपट पाठवावे. इतर कोणत्याही विषयावरवरील लघुपटांचा विचार केला जाणार नाही, असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.
संपर्क : महेंद्र पाटील :9270741809, 9820428554,
ambarbharari@gmail.com