‘हेल्प मी सी’च्या उपक्रमात आंतरराष्ट्रीय संगीतकारांच्या सहभाग
पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा अजोड नजराणा २० ऑक्टोबरला मुंबईत पेश होणार आहे. हेल्प मी सी आणि म्युझिक फॉर लाईफ इंटरनॅशनल (एमएफएलआय) या दोन संस्थांतर्फे मोतिबिंदुतून येणारे अंधत्व रोखण्यासाठीचा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येत आहे.

यावेळी ऑर्केस्ट्रा हा प्रकार भारतीय रसिकांसाठी सादर करणारा बॉम्बे चेंबर ऑर्केस्ट्रा हा समूहदेखील उपस्थित असणार आहे. या सांगीतिक कार्यक्रमात भारतीय व अमेरिकी संगीतकारांच्या कामाचा नजराणा भारतीय प्रेक्षकांना बहाल करण्यात येणार आहे.
अमजद अली खान हे आपले समागन सरोद कॉन्सर्ट सादर करतील तर, आरॉन कॉपलॅण्ड हे अमेरिकी कलाकार आपले अपलाशियन स्प्रिंग सादर करणार आहे.
दिनांक : २० ऑक्टोबर२०१६
वेळ:- संध्याकाळी ७.३०
स्थळ : टाटा थिएटर, एनसीपीए, मुंबई
नोंदणी भागीदार: www.bookmyshow.com.
कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील तिकीट उपलब्ध.