अजय सूर्यवंशी यांच्या ‘मंदिर तू’ला दिला आवाज
अजय सूर्यवंशी यांनी ‘मंदिर तू’ या भक्ती गीतांच्या अल्बममध्ये अमृता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आवाजात एक भक्तिमय प्रार्थना गायली आहे.

टल्ली बाबाजी यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला. सदर गाणी गीतकार राजू सपकाळ यांनी लिहिले असून, त्याला आशिष मोरे यांनी संगीत दिले आहे. दिग्दर्शन दिनेश मेंगडे यांनी, तर छायाचित्रण मिलिंद कोठावदे यांनी केले असून कार्यकारी निर्माता म्हणून इंदुराव कोडले पाटील यांनी कार्य पाहिले. सोबत निर्मिती व्यवस्थापक म्हणून समीर नारकर यांनी जबाबदारी पार पाडली.
‘मंदिर तू’ या गाण्यात कर्करोगग्रस्त मुलांना चित्रिकरणात सहभाग घेता यावा यासाठी गाडगे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांचे योगदान लाभले. त्यासोबत महाराणा ग्रुप चेअरमन अनिल बच्चूभाई चव्हाण, एम एम मिठाईवालाचे मनमोहन गुप्ताजी तसेच ग्लोबल आऊट डोअर चे संजीव गुप्ता यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे निर्माते अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
‘मंदिर तू*’ ही प्रार्थना लवकरच प्रकाशित होत असून, अमृता फडनवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘प्रकाशन सोहळा’ होणार असल्याचे निर्माते अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
अजय सूर्यवंशी व दिलीप कटके यांचा ‘रिमांड होम’ हा हिंदी सिनेमाही लवकरच प्रदर्शित होत आहे.