अमृताचा वाढदिवस तिच्यासाठी मेमोरेबल आणि स्पेशल बनवण्यासाठी तिच्या फॅनक्लबने गोरेगाव येथील डिझायर सोसायटी या अनाथ मुलांची काळजी घेणाऱ्या एनजीओला भेट दिली.
अमृता खानविलकरने स्वतः तिथे उपस्थित राहून तेथील मुलांसोबत वेळ घालवला. टीम अमृता आणि अमृता खानविलकर यांनी मिळून त्या मुलांना काही भेटवस्तू दिल्या. अमृता खानविलकर हिला भेटून खुश झालेल्या मुलांनी तिच्यासमोर आपल्या कला सादर केल्या. अमृताच्या चाहत्यांनी तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या लहानग्यांसाठी हा दिवस खास बनवला. मजा मस्ती आणि गप्पा गोष्टींनी रंगलेला अमृताचा हा वाढदिवस मोस्ट स्पेशल आणि लक्षात राहील असा होता यात शंकाच नाही.