आलिया भटसोबत झाली घट्ट मैत्री
मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करीत असून मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी ‘राझी’ या चित्रपटामध्ये आलिया भटसोबत काम करत आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतीच झाली. नुकतेच आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या.
‘राझी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया आणि अमृताची मैत्री अधिक वाढली हे अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. त्यामुळे अमृतासाठी आलियाने पाठवलेल्या भेटवस्तू खास ठरल्या आहेत.
अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे. ज्यात ती म्हणतेय, ‘आलियाकडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे, तसेच तिच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. तिच्यात असलेले विशेष कौशल्य अगदी कौतुकास्पद आहे. ‘राझी’ हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे परंतु तुझी भेटवस्तू अविस्मरणीय आहे.’