गडकरी रंगातयनमध्ये पहिला प्रयोग ३ नोव्हेंबरला
कीवी प्रॉडक्शनच्या सहयोगाने वेद प्रॉडक्शन निर्मित एक मनोरंजक नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येत आहे. ‘अंदाज आपला आपला’ असे या नाटकाचे नाव असून, या नाटकातील पात्रांचे परस्परांहून भिन्न असे मतं आणि विचार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

आपापल्या अंदाजावर ठाम असलेले हे प्रत्येकजण दुसऱ्यांचा अंदाज खोटे ठरवण्यासाठी कसा धडपडतो, स्वतःचा अंदाज बरोबर ठरवण्यासाठी दुसऱ्यांवर कसा कुरघोडी करतो, याची धम्माल यात पाहायला मिळणार आहे. स्वतःचेच घोडे पुढे दामटू पाहणा-या या पात्रांचा हा गाढवपणा प्रेक्षकांना लोटपोट करून हसवणारा ठरणार आहे.
‘अंदाज’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या घरंदाज नाटकाचे लेखन राजेश कोळंबकर यांनी केले असून, धम्माल दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या संतोष पवारचे दिग्दर्शन त्याला लाभले आहे, शिवाय संतोषने यात अभिनयदेखील केला असून. त्याच्यासोबतीला माधवी गोगटे ही अनुभवी अभिनेत्री पुन्हा एकदा रंगभूमीवर हास्यमैफल रंगवण्यास सज्ज झाली आहे. त्यांच्यासोबतीला ‘कन्यादान’ या मालिकेतून नावारूपास आलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुरा देशपांडे यात झळकणार असून, अक्षय केळकर हा देखणा चेहरादेखील या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण करीत आहे.
