सस्पेन्सची परिपूर्ण मेजवानी
दोन मित्र आणि त्यांची मैत्री…! या धाटणीचे अनेक सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात. मैत्रीच्या याच विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमांत ‘अंड्याचा फंडा’ या आगामी चित्रपटाचादेखील समावेश होतो. अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी निर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित या सिनेमाचे संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शन व कथालेखन केले आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे पोस्टर पाहिले असता हा सिनेमा नक्कीच धम्माल आहे, हे लक्षात येते.

अथर्वने यापूर्वी ‘माय डियर देश’, ‘असा मी अशी ती’, ‘पोर बाजार’ यासारख्या चित्रपटात काम केले असून शुभमने ‘रईस’ या बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. शिवाय लवकरच येणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्येदेखील शुभम झळकणार आहे. अशा या अभिनयात मुरलेल्या बालकलाकारांच्या ताफ्यात मृणाल जाधवचादेखील समावेश आहे. ‘लय भारी’, ‘तु ही रे’ तसेच हिंदीतील ‘दृश्यम’ या चित्रपटातून रसिकांच्या पसंतीस उतरलेली ही चिमुरडी ‘अंड्याचा फंडा’मध्ये काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.