शास्त्रीय नृत्य शिक्षण आणि प्रसारासाठी गेली ३४ वर्षं कार्यरत असलेली नृत्यकला निकेतन शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण ही संस्था आता एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. या संस्थेतर्फे ‘भरतनाट्यम अरंगेत्रम’ हा १००वा शास्त्रीय नृत्याविष्कार सोमवार दि. १४ नोव्हेंबर सायंकाळी ४.३० वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सुवर्णमहोत्सवी शास्त्रीय नृत्याविष्कार १४ नोव्हेंबरला
‘नृत्यकला निकेतन’च्या ‘अरंगेत्रम’चे शतक!
संस्थेच्या गुरु मयुरी खरात यांनी अशी माहिती दिली की, माझी आई, संचालिका व ज्येष्ठ नृत्यगुरू अर्चना पालेकर यांनी गिरगाव येथे १९८२मध्ये नृत्यकला निकेतनची स्थापना केली. आजपर्यंत या संस्थेतून असंख्य विद्यार्थिनींनी भरतनाट्यमचे धडे गिरवले. भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रथम रंगमंच प्रवेश म्हणजे ‘अरंगेत्रम’. संस्थेच्या विद्यार्थिनींची आतापर्यंत ९९ अरंगेत्रम संस्थेनं सादर केली. आता संस्था अरंगेत्रमची शंभरी साजरी करत आहे.
१००व्या कार्यक्रमात श्रेया माजगावकर आणि इवांजलीन चेट्टी या विद्यार्थिनी अरंगेत्रम सादर करणार आहेत. यावेळी संस्थेच्या पूर्वीच्या विद्यार्थिनीही आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
संस्थेच्या संचालिका गुरू अर्चना पालेकर आणि गुरु मयुरी खरात यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच संस्थेचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम झाले आहेत. गरजू विद्यार्थिनींना अल्पशुल्क आणि मोफत नृत्य शिक्षण दिलं जातं. शास्त्रीय नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच संस्था कार्यरत आहे. त्यातून अनेक नृत्यकलावंत घडत आहेत.