चित्रकार अशोक हिंगे यांच्या कलाकृतींचे १ नोव्हेंबरपासून प्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकार अशोक नामदेव हिंगे यांचे ‘प्रतीकरूपक’ या शीर्षकांतर्गत त्यांच्या कलाकृतींचे एकल प्रदर्शन बदलापूर आर्ट गॅलरी, हेंद्रेपाडा, बदलापूर (पश्चिम), ठाणे येथे १ नोव्हेंबरपासून सुरु होत असून, ते १५ नोव्हेंबर २०२१पर्यंत सुरु राहणार आहे. सर्व कला रसिकांना सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत या प्रदर्शनातील कलाकृती विनामूल्य बघता येतील.
प्रतीकरूपक
दृश्यजाणिवांच्या संवेदनांची आवृत्ती, पुनरावृत्तीच्या दृश्यरूप रचनाबंधाचे अवकाशीय ‘स्थिररूप’ म्हणजे चित्र. त्या चित्रातील ‘संवेदनांची वर्तन रुपके’ हे अशोक हिंगे यांच्या चित्ररूप दृश्यभाषेचे सकृतदर्शन होय. संवेदनांच्या वर्तनांचा भाग अशोक यांनी अनुभवला असून प्रतीक रूप तत्व आधारे चित्र रचना निर्मिती करून दृकसंवाद साधला आहे.
स्व’ अध्यायी दृश्य अवकाश जाणिवेच्या, अनुभवांच्या सीमांत रेषेच्या दृश्य कडे वरील दृश्य नोंदिंची प्रतिके असतात. मानवी मेंदूतील विशिष्ट अवधारणा प्रणाली (Unique Identification System) संवाद साधण्यासाठी मनुष्य विकसित करतो. ती विकसित प्रणाली, मनुष्य जाणिवेची सूक्ष्म दृश्य जाणिव चेतवण्याचे कार्य करत असते. ज्याने दृश्य कला ज्ञान घडते. विकासाच्या अनेक टप्प्यात जाणिव जिथे एका स्थितीत स्थिर होताना दिसते . तिथे प्रतिकरूप तयार होवू लागते. जी प्रतिकें असीम जाणिव निर्माण करतात ती जास्त प्रभावी ठरतात. प्रतीक निर्मितीत तंत्रज्ञानाच्या जाणिवेला अधिक महत्व नसते. तंत्राच्या परिणामाला महत्व असते. प्रतिक प्रेक्षकांच्या आकार अनुभवाच्या जाणिवेला आवाहन करतात. हेच त्याचे यश व आनंद आहे. याच जाणिवेचे रूपांतरण माणूस आस्थे मध्ये करतो. याच जाणिवेची नोंद अशोक हिंगे हे त्यांच्या दृश्य कृतीतून, माध्यमातून स्थापित करतात .
दृश्यात्मा (Visual Psyche) किंवा प्रतीकात्मा (Symbolic Psyche) ओळखण्याचे लक्षण म्हणजे पाहण्यानें होणारा दृश्य प्रतीकानंद होय. दृश्य विचार किंवा दृश्य गुणांच्या संवेदनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दृश्य आकार प्रतीकांचा सहज उपयोग होतो. ही मेख ज्याला कळली तो द्रष्टा होतोच. याच जाणिवेची मेख अशोक यांनी प्रदर्शनातून मांडली.
अशी प्रतिकें पाहणं, अनुभवणं म्हणजे प्रत्यक्ष दृश्यात सत्य नरानें आयन (ion) पाहणे असते. तें जें आपले ( स्व ) प्रतिक रूप पाहणं आहे तें म्हणजे ‘दृश्यसत्यनरआयन’ अंश पाहणे होय.
चित्रकार : अशोक नामदेव हिंगे
प्रदर्शनाचे शीिर्षक : ‘प्रतीकरूपक’
कालावधी : १ ते १५ नोव्हेंबर २०२१
स्थळ : बदलापूर आर्ट गॅलरी, हेंद्रेपाडा, बदलापूर (पश्चिम), ठाणे – ४२१५०३
वेळ : सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत
संपर्क क्र. : ९९६०५८६०१४ / ९९३०१०३३६९