अमेरिकेत फुलवताहेत ‘मराठी अंगण संस्कृती’
मराठी संस्कृती म्हणजे दारापुढे अंगण, अंगणातली तुळस आणि सोबतीला इतर झाडं! आजकाल अशी संस्कृती फार फारफार तर गावी दिसून बघायला मिळते. थोडक्यात अंगण संस्कृती कुठंतरी लोप पावत आहे. परंतु परदेशात राहूनही अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मात्र या ‘अंगण संस्कृती’चे जतन केले आहे.
‘परसातल्या भाज्या’ ही पारंपारिक पद्धती आज अमेरिकेत जिंवत ठेवलीये ती अश्विनी भावे यांनी! गेले काही वर्षे त्यांनी हा उपक्रम सुरु केला आणि तो किती व्यवस्थितरित्या यशस्वी झाला हे लोकांनी पाहावं म्हणून अश्विनी भावे यांनी आपल्या फेसबुकवर ‘द ग्रीन डोअर’ हा नवीन उपक्रम सुरु केलाय. अश्विनी भावे यांनी आपल्या अमेरिकेच्या राहत्या घरच्या मागच्या कुंपणामध्ये वेगवेगळी फळं, फुलं आणि भाज्यांची बाग तयार केली आहे आणि ह्याच भाज्या त्यांच्या नेहमीच्या स्वयंपाकाचा भाग असतात.
अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्ये राहूनही अश्विनी भावे यांनी आपलं मराठीपण जपलं. ह्याच बागेमधील भाज्या त्यांच्या घरी आणल्या जातात. सध्या ह्या ‘द ग्रीन डोअर’ मोहिमेला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या बागेमध्ये आलेल्या मॅग्नोलिया ह्या सुंदर फुलाचा विडिओ व्हायरल झाला आहे.
या मोहिमेबद्दल बोलताना त्या सांगतात की, ‘प्रत्येकाची श्रीमंतीची कल्पना वेगळी असते आणि ही बागच माझी श्रीमंती आहे.’
संस्कृती आणि निसर्ग ह्यांचा सुंदर मेळ घालून त्यांनी ह्या मोहिमेला सुरवात केली आहे. ह्या उपक्रमाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत हे विशेष