प्रवेशप्रक्रिया १० सप्टेंबरपासून
हिंदी मनोरंजन क्षेत्रातल्या प्रवेशाची एक पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्तित्व, आय.एन.टी आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या हिंदी एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
यंदा शनिवार १४ ऑक्टोबर २०१७ तारखेला ही स्पर्धा संपन्न होईल. स्पर्धेचे यंदाचे बारावे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात खुल्या गटासाठी होणारी ही एकमेव हिंदी एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांची नाटके किंवा मुळ एकांकिका हिंदी तसेच गुजराती व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्यासाठी अस्तित्व स्पर्धकांना विशेष साहाय्य उपलब्ध करून देते. या उपक्रमाला गेल्या आठ वर्षात भरीव यश प्राप्त झाले आहे.
यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी, रविवार ८ ऑक्टोबर तालीम स्वरूपात तर अंतिम फेरी शनिवार १४ ऑक्टोबरला संपन्न होईल.
या दोन्ही फेऱ्या सह-आयोजक असलेल्या विलेपार्ले इथल्या साठ्ये महाविद्यालयाच्या रिहर्सल हॉल / मिनी थिएटर मध्ये होणार आहेत.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज १० सप्टेंबर २०१७ पासून अस्तित्वच्या www.astitva.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम आणि एकमेव तारीख ३० सप्टेंबर आहे.
यंदा किमान १५ एकांकिका स्पर्धेत दाखल झाल्यातरच ही स्पर्धा घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असून प्रवेशाची अंतिम तारखेत कुठलीही वाढ केली जाणार नाही.
स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क : रवी मिश्रा –९८२१०४४८६२