रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे आयोजन
रोटरी क्लबतर्फे सुरु करण्यात आलेल्या या ग्रुपचे उदघाटन डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी रोटरी क्लबचे जिल्हा प्रशासक बी. एम. शिवराज अध्यक्ष नितीन शेंबेकर, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ् डॉ. अद्वैत पाध्ये आणि ‘अस्तु’ चित्रपटाच्या निर्मात्या शीला राव आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांसाठी तसेच त्यांची काळजी घेत असलेल्या व्यक्तींसाठी ‘अस्तु’ या चित्रपटाचा खास शो नुकताच संपन्न झाला. ४५०-५०० रसिक प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला.

चित्रपट संपल्यावर झालेल्या चर्चेत रसिक श्रोत्यांनी उपस्थित मान्यवर मंडळींसोबत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या आजाराविषयी अनेकांच्या मनात शंका संभ्रम निर्माण झालेले असतात. “अस्तु” चित्रपटात स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांच्यातील भाव परिणामकारक रित्या चित्रित करण्यात आले आहेत.