केतकी मालपेकर, अमृता रावचा पुढाकार
सुंदर मी होणार, असं वाटणाऱ्यांसाठी माहीममध्ये अद्ययावत ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ रविवारी अर्थात २९ जानेवारीपासून सुरु झाले असून, केतकी मालपेकर आणि अमृता राव या दोघींनी मिळून उभारलेला ‘ब्युटी बार’ अनेकांना आकर्षित करणार आहे.


केतकी मालपेकर या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या कन्या आहेत. आई ग्लॅमर फिल्डमध्ये काम करत असल्यामुळे केतकी यांना लहानपणापासूनच फॅशन दुनियेची जवळून ओळख झाली. २००८ मध्ये त्यांनी उदय टक्के यांच्याकडून हेअर ड्रेसिंगचे तांत्रिक ज्ञान शिकून घेतले. सतत बदलणाऱ्या या ग्लॅमवर्ल्डमध्ये स्वबळावर काहीतरी करून दाखवावं ही त्यांची मनीषा आता लवकरच ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’च्या स्वरुपात पूर्ण होणार आहे. तर दूरदर्शनमध्ये गेली २४ वर्ष न्यूज रिडर म्हणून कार्यरत असणाऱ्या अमृता राव याही ‘सील्व्हेट हेअर अँड ब्युटी बार’चा एक मुख्य भाग आहेत.
एम.एस.सी, एल.एल.बी अमृता राव या ‘राव ग्रुप ऑफ केमिकल्स कंपनीज्’च्या डायरेक्टर आहेत. मुळातच शिक्षण आणि कलांची आवड असलेल्या अमृता राव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत उत्तोमोत्तम कलाकृती दिल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी ७ चित्रपटांची निर्मिती केली असून ‘मानिनी’, ‘आरोही’ यांसारख्या चित्रपटांतून स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि स्त्री भ्रूण हत्येविरोधात त्यांनी आवाज उठवत मोलाचा संदेश समाजाला दिला. त्याशिवाय अमृता राव या बरेच वर्षे विविध मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणूनही काम पाहत आहेत.
अमृता राव आणि केतकी मालपेकर यांच्या ब्युटीबार मध्ये तुम्हाला सगळ्या ट्रिटमेंट्सचा एकाचवेळी उपभोग घेता येईल. हेअर ड्रेसिंग, हेअर कलरिंग याचबरोबर अलीकडे तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असणारी नेल्स आर्ट, नेल्स एक्स्टेंशन यांसारख्या ट्रिटमेंट्सचा ही फायदा तुम्हाला ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ मध्ये घेता येईल.
नवनवीन टेक्निक्स आणि उत्तम टेक्निशियन्सच्या साथीने तुम्ही अधिकाधिक सुंदर दिसू शकता पण त्यासाठी तुम्हाला एकदा तरी ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ला भेट द्यावी लागेल.
संपर्क : सिल्वूएट हेअर अँड ब्युटी बार, १४-प्लॉट नो. ३३३,
कार्ड मेन्शन, शीतलादेवी रोड, युनियन बँक जवळ, माहीम, मुंबई-१६