नव्या वर्षात नव्या चित्रपटाची उत्सुकता
शांभवी फिल्मस निर्मित ‘बेभान’ हा मराठी सिनेमा येत्या वर्षात प्रदर्शित होत असून त्यात ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडे यांची हटके जोडी पाहता येणार आहे. या दोघांसोबतचं स्मिता जयकर व संजय खापरे यांच्याही अभिनयाची जुगलबंदी बघता येणार आहे.
मिस्टर वर्ल्ड विजेता ठाकुर अनूपसिंग आपल्या मराठीतल्या पहिल्या वहिल्या पर्दापणास सज्ज झाला आहे. अनूप अशोक जगदाळे दिग्दर्शित आगामी ‘बेभान’ या सिनेमात ठाकुर अनूपसिंगचा मराठमोळा अंदाज पाहता येणार आहे. सिंघम -३ या तेलगू तर कमांडो २ या हिंदी अशा आगामी सिनेमांमध्ये ठाकुर अनूपसिंग झळकणार आहे.
दिग्दर्शक अनूप अशोक जगदाळे यांच्या ‘बोभाटा’ या सिनेमाची चर्चा सिनेवर्तुळात जोरदार चालू सुरु असतानाच मधूकर (अण्णा) उद्धव देशपांडे निर्माते आणि प्रसाद देशपांडे सहनिर्माते असलेला ‘बेभान’ रसिकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. दिनेश देशपांडे यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.
ए.वि प्रफुल्लचंद्र यांनी ‘बेभान’ला सुमधूर संगीत दिले असून मंगेश कांगणे यांनी गीते लिहिली आहेत. अनूप-अनूप अशा जोडगोळीचा रोमान्स विथ अॅक्शन असलेला सिनेमा २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.