२५ मार्च ते ३१ मार्चदरम्यान ‘फक्त मराठी’वर
अष्टपैलू व हरहुन्नरी अभिनेता भरत जाधव. आजवर अनेक चित्रपट व नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. भरत यांना मानाचा मुजरा करीत ‘फक्त मराठी’ने ‘भरत जाधव विशेष चित्रपटां’चा नजराणा २५ मार्च ते ३१ मार्चदरम्यान दररोज सायंकाळी ७:३० वा. प्रेक्षकांसाठी आणला आहे.
या चित्रपटांमध्ये ‘चल गजा करू मजा’, ‘सालीनं केला घोटाळा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘गोंद्या मारतंय तंगड’, ‘काळशेकर आहेत का?’, ‘होऊन जाऊ दे’, ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ या चित्रपटांचा आस्वाद ‘फक्त मराठी’च्या प्रेक्षकांना घेता येणार आहे.