भास्कर सिंघा यांच्या चित्रांचे प्रदर्शन
चित्रकार भास्कर सिंघा यांचा जन्म पश्चिम बंगालच्या एका लहान खेड्यात झाला. त्यानी कॉलेज ऑफ आर्ट्स कोलकाता येथे कलेचा अभ्यास करून आपल्या मधल्या कलाकाराची स्वप्नं साकार करण्याचा प्रयत्न केला आणि कला क्षेत्राला वाहून घेतलं. भास्कर यांनी रंगांचा उपयोग करून स्वत:ची अशी एक वेगळी शैली विकसित केली. त्यांनी रंगीत पारदर्शकता दर्शवित या वेगळ्या शैलीसह कला जगामध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापीत केली. गेल्या दोन दशकांपासून या तंत्रज्ञानावर ते काम करीत आले आहेत. ते हवेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. मानवी भावनांना स्पर्श करता येत नाही पण आनंदाच्या मूडमध्ये हवा सहजतेने वाहते पण क्रोधित झालं असता उरात धडकी भरते. वायू सर्व व्यापक असून तोच त्यांच्या पेंटिग्जसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
दिल्लीस्थित सुप्रसिद्ध चित्रकार भास्कर सिंघा यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’ हे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, १६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई २८ मेपासून सुरु होत आहे. ३ जूनपर्यंत सुरु राहणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य बघता येईल.

भास्कर म्हणतात ‘सृष्टी एका चक्रात बांधली जाते जी विश्वातील सर्वव्यापी शक्ती आहे. वारा सतत आकार बदलत असल्याने आपल्या आतही सतत बदल होत असतात आणि तेच मनोदय आणि भावना प्रतिबिंबीत करत असतात.’
चित्रकला हे या चित्रकारासाठी ध्यान असून ते निर्मितीच्या या प्रक्रियेत राहाताना त्याना वेदना आणि सुख देत असतं. अध्यात्मिक समाधान प्राप्त करण्यासाठी म्हणून ते जागा, रंग, रूप आणि आकृती यांचं संतुलन साधतात.
या अनोख्या शैलीच्या कलाकाराने आजपर्यंत बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, दुबई, सिंगापूर, यूएसए आणि लंडन येथील एकलसह समुह प्रदर्शनात भाग घेतला आहे. मुबईकर कला रसिकांनी त्याचा जरूर लाभा घ्यावा.