१५ सप्टेंबर प्रवेशाची अखेरची तारीख
कमी खर्चात आपले गुण जगासमोर मांडण्याची संधी फक्त शॉर्ट फिल्ममधूनच मिळू शकते; परंतु ती शॉर्ट फिल्म जोपर्यंत जगासमोर येत नाही आणि त्याला नामवंतांची शाबासकी मिळत नाही तोवर त्याचा उपयोग होत नाही. ‘कॅफेमराठी’ने अशाच हुशार फिल्ममेकर्ससाठी ‘कॅफेमराठी शॉर्ट फिल्म स्पर्धे’चे आयोजन केले आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी अनेक न्यू फिल्ममेकर्स विविध प्रकारे प्रयत्न करत असतात. सर्वांनाच त्यात लगेच यश मिळत नाही. शॉर्ट फिल्म मेकिंग हा त्यासाठी शॉर्ट पण स्मार्ट पर्याय आहे. त्या शॉर्ट फिल्मची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही शॉर्ट फिल्म स्पर्धा दोन विभागात असणार आहे. एक म्हणजे खुला वर्ग आणि दुसरा म्हणजे विद्यार्थी वर्ग. मराठी छुप्या फिल्ममेकर्सला प्रोत्साहन देण्यासाठी ‘कॅफेमराठी’ने या शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली नसून मोफत प्रवेश मिळणार आहे.
तरुण आणि छुप्या फिल्ममेकर्सला व्यासपीठ मिळावे या हेतुने ही स्पर्धा आयोजित होत असून, ज्यात मराठी भाषेतील शॉर्ट फिल्मला संधी मिळणार आहे.
१५ सप्टेंबर २०१६ पर्यंत रजिस्ट्रेशन आणि शॉर्ट फिल्म प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे. आलेल्या सर्व शॉर्ट फिल्ममधून १० शॉर्ट फिल्म निवडल्या जातील आणि त्यातून ३ सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म निवडल्या जातील.
या स्पर्धेसाठी फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत अभिनेते, दिग्दर्शक परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. विजेत्यांना त्यांच्यासोबत संवादही साधता येईल. त्यातील काही लक्षणीय आणि उल्लेखनीय टीमला ‘कॅफेमराठी’ त्यांची नवीन फिल्म बनवण्याची संधी देईल. स्पर्धेच्या प्रवेशाबाबत बाबत काही अडचण भासल्यास hello@cafemarathi.com किंवा ८४२२९१५९२५ वर संपर्क करावा.
नियम व अटी :
१. शॉर्ट फिल्मची प्रमुख भाषा मराठी असावी. कथेच्या मागणीनुसार त्यात इंग्रजी शब्द असतील तर काही हरकत नाही.
२. कालावधी एक मिनिट ते वीस मिनिट.
३. विद्यार्थी वर्गातील टीममधील सर्व सदस्यांनी पूर्ण वेळ विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
४. प्रवेश प्रक्रिया ‘कॅफेमराठी’च्या वेबसाईट किंवा मोबईल अॅपवरील कॉंटेस्ट विभागात जाऊन करावी.
५. निवड झालेल्या टीम्सना तसेच उल्लेखनीय टीमला वैयक्तिक कळविण्यात येईल.
६. शॉर्ट फिल्म स्पर्धेचे सर्व हक्क ‘कॅफेमराठी’ कंपनीकडे असतील.