
आरव जिंदल आणि विनोद माणिकराव
युफोरिया प्रॉडक्शन्सची ‘चाहूल’ ही रहस्यमयी मालिका सोमवारपासून कलर्स मराठीवर रात्री १०.३० वा. प्रसारित होत आहे. निसर्गसौंदर्याने सजलेल्या भोर तालुक्यामध्ये ‘चाहूल’चे चित्रीकरण चालू असून निर्माते आरव जिंदल आणि विनोद माणिकराव हे दोघेही यात जातीने लक्ष घालत आहेत. ‘चाहूल’च्या निर्मात्यांनी मालिकेच्या चित्रीकरणात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ‘चाहूल’च्या कथानकाला साजेसे ग्रॅंजर प्रेक्षकांच्याही लक्षात यावे याकरिता विशेष मेहनत घेतली आहे. या मालिकेमध्ये दृश्यचमत्कृतीसाठी वापरण्यात येणारा ड्रोण कॅमेरा, उत्तम टेक्निशियन्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. ड्रोण कमेराद्वारा शूट केलेले मोठमोठे कॅनव्हास आणि टॉप शॉट्सचा इम्पॅक्ट आपल्याला मालिकेच्या प्रत्येक भागांमध्ये अनुभवायला मिळेल.