चंद्रकांत कुलकर्णी, कांचन सोनटक्के यांचा सन्मान
‘चैत्र चाहूल’चा २०१७चा रंगकर्मी सन्मान चंद्रकांत कुलकर्णी आणि ध्यास सन्मान यांना जाहीर झाला असून, या पुरस्काराचे वितरण २८ मार्चला रवींद्र नाट्य मंदिरामध्ये समारंभपूर्वक केले जाणार आहे. याप्रसंगी महर्षी दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरिय पारितोषिक विजयी एकांकिका ‘दफ्तर सादर करणार आहेत. निसर्ग कवी नलेश पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे.
चैत्र चाहूल तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष पुरस्काराचे यंदाचे १२ वे वर्षे आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांचे गेली अनेक वर्षे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात योगदान आहे. आपल्या कलात्मक निर्मिती आणि दिग्दर्शनाने त्यांनी अनेक उत्तम कलाकृती साकारल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ध्यानीमनी या चित्रपटाने रसिकांची मने जिंकली.
ध्यास सन्मानासाठी निवड करण्यात आलेल्या कांचन सोनटक्के या मुले, विविध अपंग, प्रोढकला परफॉर्मिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अपंग कला परफॉर्मिंगच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर विविध कामे केली आणि अनेक बाल कलाकार घडविले. सोलापूर शहरातील पहिल्या आणि नांदेड येथे झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय बालनाट्य समेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. बाल रंगभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण मंगळवार २८ मार्च, २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वा. रविंद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे.ज्येष्ठ समीक्षक कमालकर नाडकर्णी आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचे संचालक संजय हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहऴा होणार आहे. याप्रसंगी महर्षी दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरिय पारितोषिक विजयी एकांकिका ‘दफ्तर’ सादर करणार आहेत. तसेच निसर्ग कवी नलेश पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेता किशोर कदम, कवी अरुण म्हात्रे, सौमित्र हे काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करतील. त्याचप्रमाणे पंडित शौनक अभिषेकी यांचा बहारदार गीतांची मैफल सादर आहे.
या कार्यक्रमासाठी काही जागा वाचकांसाठी राखीव ठेवल्या आहेत. मॅजेस्टीक बुकस्टॉल, शिवाजी मंदीर, दादर येथे कोणतेही मराठी पुस्तक खरेदी करा आणि विनामूल्य प्रवेशिका मिळवा. या कार्यक्रमात जागा मर्यादीत असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश देण्यात येईल, असे कार्यक्रमाचे संयोजक विनोद पवार यांनी कळविले आहे.