राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा नव्या स्वरूपात जाहीर
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील हौशी रंगकर्मींसाठी पर्वणी ठरलेली ‘चंद्रपूर करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा नव्या स्वरूपात जानेवारी २०१७मध्ये आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार विभागांसाठी दिनांक ५ ते १५ जानेवारीदरम्यान प्राथमिक फेरी आणि दिनांक २८ आणि २९ जानेवारीदरम्यान चंद्रपूरात अंतिम फेरी असे या एकांकिका स्पर्धेचे स्वरूप निश्चीत करण्यात आले आहे.
चंद्रपूरातील ज्येष्ठ रंगकर्मी विलास उपाख्य नाना बोझावार स्मृतिप्रित्यर्थ शील प्रॉडक्शन्स चंद्रपूर आणि आम्ही चंद्रपूरकर या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चंद्रपूर करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला गेल्या वर्षीपासुन सुरूवात झाली. गेल्या वर्षी राज्यातील गाजलेल्या ४६ एकांकिका या स्पर्धेत सादर झाल्या होत्या. यावर्षी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार विभागांमध्ये प्राथमिक फेरी आयोजित करण्यात येणार असून त्यातील निवडण्यात आलेल्या एकांकिकांची अंतिम फेरी चंद्रपुरात आयोजित करण्यात येणार आहे.
प्राथमिक फेरीचे स्थळ आणि दिनांक सहभागी होणा-या संस्थांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरणा-या अर्थात चंद्रपूर करंडक विजेती ठरणा-या एकांकिकेला ५० हजार रूपयांचे रोख पारितोषिक व चंद्रपूर करंडक देण्यात येईल. द्वितीय क्रमांकाच्या एकांकीकेला ३० हजार रूपयांचे रोख पारितोषिक तर तृतीय क्रमांकाच्या एकांकीकेला २० हजार रूपयांचे रोख पारितोषीक देण्यात येणार आहे.
या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी दिनांक ३० डिसेंबर २०१६पर्यंत आपल्या प्रवेशिका खालील पत्तयावर पाठवाव्या.
-डॉ. जयश्री कापसे-गावंडे, श्री स्वरूप प्लाझा विंग नं. २, सिंधी पंचायत भवनजवळ, झाडे लेआऊट, रामनगर, चंद्रपूर – ४४२४०२
स्पर्धेसाठी ५०० रूपये अनामत शुल्क आणि ५०० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.
शुल्क दोन स्वतंत्र डिमांड ड्राफ्टद्वारे स्वीकारण्यात येईल. डी.डी. ‘शील प्रॉडक्शन, चंद्रपूर’ या नावाने पाठवावा.
सादरीकरण झाल्यानंतर अनामत शुल्क परत करण्यात येईल.
इच्छूक संघांनी अधिक माहितीसाठी – डॉ. जयश्री कापसे–गावंडे 9822571774, अजय धवने 9822565926, सुशिल सहारे 9930401102 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या स्पर्धेत राज्यातील नाटय संस्थांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शील प्रॉडक्शन आणि आम्ही चंद्रपूरकर या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.